ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाबधितांच्या संख्येने 90 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 90 लाख 60 हजार 786 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 21 हजार 676 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी ब्राझीलमध्ये 60 हजार 301 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1439 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 90.60 लाख कोरोनाबाधितांपैकी 79 लाख 23 हजार 794 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 लाख 15 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत