बेळगावकरांना दिलासा, रविवारी 27 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या सुधारित अवतारामुळे ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांवर आरोग्य विभागाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. बेळगावात आलेल्या चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यामुळे आरोग्य अधिकाऱयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दरम्यान, रविवारी जिल्हय़ात कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या आठ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 13 व 14 डिसेंबर रोजी ब्रिटनहून बेळगाव जिल्हय़ात चौदा जण परतले आहेत. अथणी येथील एक, चिकोडी तालुक्मयातील 3, बेळगाव शहर व उपनगरातील 10 जणांचा यामध्ये समावेश आहे. कोरोनाच्या सुधारित अवताराची धास्ती वाढल्यानंतर आरोग्य विभागाने या सर्व चौदा जणांवर लक्ष ठेवले होते.
त्या चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चौदा दिवसांची होमकेअरची मुदतही त्यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील सुधारित अवताराची धास्ती बेळगावकरांसाठी कमी झाली आहे. तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता ब्रिटनमधून बेळगावात परतलेल्या चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी बाळेकुंद्री खुर्द, मंडोळी, शिवबसवनगर, अनंतशयन गल्ली, भाग्यनगर, जेएनएमसी कॅम्पस परिसरासह तालुक्मयात 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 200 हून अधिक झाली असून त्यापैकी 25 हजार 635 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 216 सक्रिय रुग्ण आहेत.
अद्याप जिल्हय़ातील 4 हजार 147 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. गेल्या 24 तासांत पंधराशेहून अधिक जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 3 लाख 72 हजार 777 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 40 हजार 446 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ब्रिटनमधून आलेल्या सुधारित अवताराची धास्ती बेळगावातही सुरू असली तरी ब्रिटनमधून परतलेल्या चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बेळगावकरांना तूर्त दिलासा मिळाला आहे.