ऑनलाईन टीम / लंडन :
अमेरिकेचा दबाव आणि चीनच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत ब्रिटनने चीनच्या प्रसिद्ध हुआवेई (Huawei) या कंपनीला आपल्या 5G नेटवर्कमधून टप्प्याटप्प्याने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनच्या या निर्णयाचा चीनला मोठा धक्का बसला आहे.
ब्रिटन मागील 20 वर्षांपासून हुआवेई कंपनीच्या उपकरणांवर अवलंबून होता. ब्रिटनच्या या निर्णयाने चीनसोबतच्या त्यांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. तसेच ब्रिटनच्या मोबाईल सेवा पुरवढादारांना याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. चिनी कंपन्या कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने निष्ठा ठेवतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत अमेरिकेने यापूर्वीच या कंपनीवर बंदी घातली आहे.
लंडनमधील चीनच्या राजदूत लियू शियोमिंग यांनी ब्रिटनचा हा निर्णय चुकीचा आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळे त्यांची डिजिटल सेवा स्लो होईल, असे हुआवेईने म्हटले आहे.