विविध उत्पादनांना पसंती -बाजारातील वाटा वाढवणार
नवी दिल्ली
31 डिसेंबर 2020 ला संपलेल्या तिसऱया तिमाहीमध्ये ब्रिटानिया कंपनीला 452 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा नफा 22 टक्के इतका अधिक आहे.
मागच्या वषी समान कालावधीत कंपनीला 369 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीअखेर 495 कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमावला होता. ग्रामीण भागासह सर्वच स्तरावर उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी कंपनी कसोशीने प्रयत्न करत आहे. विविध प्रकारचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले. कंपनीचा महसूल सहा टक्क्मयांनी वाढून तीन हजार 3,165 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी या कालावधीतला महसूल 2,982 कोटी रुपये इतका होता. सप्टेंबर अखेरचा तिमाहीतला महसूल 3,419 कोटी रुपये इतका होता. कंपनी येणाऱया काळात सातत्याने बाजारातील वाटा वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.