साहित्य : 5 ब्रेड स्लाईस, अर्धी वाटी दही, पाव वाटी बेसन, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हिंग, पाव वाटी उभट अगदी पातळ चिरलेला कांदा, चवीपुरते मीठ, चिमुटभर खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल, सजावटीसाठी टोमॅटो केचप
कृती : प्रथम बेड स्लाईसच्या कडा सुरीच्या साहाय्याने काढाव्यात. आता बेडचे अगदी छोटे छोटे तुकडे करून बाऊलमध्ये काढावेत. त्यामध्ये दही, बेसन, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट पावडर, हिंग, कांदा आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याच्या पीठाप्रमाणे बॅटर तयार करून घ्यावे. नंतर त्यात खाण्याचा सोडा घालावा. गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करुन आच मंद करावी. आता गरम तेलात छोटी छोटी भजी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. आता तयार ब्रेड भजी टोमॅटो केचप सोबत खाण्यास द्या.