नवी दिल्ली
लॉजिस्टिक क्षेत्रात ब्लॅकस्टोन ग्रुपने एम्बसी इंडस्ट्रियल पार्कची खरेदी केली असल्याचे समजते. हा खरेदीचा व्यवहार 5 हजार 250 कोटी रुपयांना झाल्याचेही समजते. अमेरिकेतील खासगी कंपनी ब्लॅकस्टोन ग्रुपने वॉरबर्ग पिंकस व एम्बसी ग्रुपकडून एम्बसी इंडस्ट्रियल पार्कची खरेदी केली आहे. एम्बसी इंडस्ट्रियल पार्कची बेंगळूर, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद व पुणे येथे लॉजिस्टिकच्या विकासासाठी 22 दशलक्ष चौ. फू. इतकी जागा असल्याचे सांगण्यात येते. या जागा ई-कॉमर्स कंपन्यांना व रिटेल क्षेत्रातील कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत.