नेपाळच्या कंचनवनातील सोहळा, उधळला गेला रंग अन् गुलाल
नेपाळच्या जनकपूर मंदिरातपून भगवान श्रीराम आणि माता जानकी यांची पालखी शनिवारी दुपारी कंचनवनात पोहोचली असता रंग-गुलालाचा वर्षाव झाला आहे. याचबरोबर त्रेतायुगापासून सुरू असलेल्या परंपरेच्या अंतर्गत होळीच्या दहा दिवसांपूर्वीच भगवान राम आणि माता सीतेच्या होळीसह मिथिलेमध्ये फागोत्सव सुरू झाला आहे. विवाहानंतर भगवान श्रीराम माता सीतेसह मिथिला दर्शनसाठी बाहेर पडले हेत. या 15 दिवसांच्या परिक्रमेच्या 7 व्या दिवशी जेव्हा ते कंचनवनात पोहोचले तेव्हा होळीचा दिवस होता. याच कंचनवनात दोघांनीही होळीचा सण साजरा केल्याचे म्हटले जाते.
तेव्हापासून आजपर्यत दरवर्षी हजारो साधू-संत, महिला-पुरुष कंचनवनात पोहोचून फगुआची (होळी) सुरुवात करतात. यानिमित्त येथे मोठय़ा संख्येत भाविक एकत्र येत असतात. श्री मिथिला बिहारी आणि किशोरीजी यांची पालखी पोहोचतात सर्वजण एकमेकांवर रंग-गुलाल उधळू लागतात.