बुधवार दि 15 ते 21 सप्टेंबर 2021
विविध कारणामुळे लागणारे अन्नाचे दोष
घरात अथवा बाहेर कुठेही खाताना पिताना खबरदारी बाळगली पाहिजे कारण मनुष्य प्राण्याच्या जीवनात जी काही संकटे येतात ती अन्न संक्रमणातून येतात असे काही वेळा दिसून येते. घर असो अथवा हॉटेल किंवा जंगलात सहलीसाठी शिजवलेले अन्न कुठेही पहा, स्वयंपाक करताना किंवा कोणतेही खाद्यपदार्थ तयार करताना करणाऱयाच्या मनात जे काही चांगले वाईट विचार घोळत असतात ते विचार त्या अन्नात उतरतात. कोणत्याही मंदिरातील प्रसाद पहा तो कसाही, कितीही साधा असो पण तो गोड लागतो कारण त्यात पवित्र आणि दैवी शक्तीची स्पंदने उतरलेली असतात. याच्या उलट काही घरातील अन्न खाल्ल्यावर किंवा नाष्टा केल्यावर अस्वस्थ वाटू लागते. तब्येत बिघडते किंवा स्वभाव चिडखोर होऊ लागतो. हाती घेतलेले कोणतेही काम होत नाही कारण स्वयंपाक करणाऱयाच्या मनात येणारे चांगले वाईट विचार. त्या घरातील व्यक्तींचे बरे-वाईट संस्कार छळून, त्रासून, लुबाडून अथवा एखाद्याचा तळतळाट घेऊन कमावलेले धन असेल तर अशा घराण्यात कितीही चांगले अन्न शिजवले तरी ते निश्चितच बाधते. त्या घरात सतत आजारपण, अपयश, मानहानी असे प्रकार सुरू असतात. त्यासाठी कुठेही खाताना पिताना ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ असे म्हणतात. जिथे अन्न शिजवले जाते तेथे सतत मंत्रोच्चार, विष्णुसहस्त्रनाम किंवा कोणताही मंत्र अखंड चालू असेल तर तेथील पवित्र स्पंदने त्या अन्नात उतरतात व ते अन्न गोड लागते. जिथे राग, द्वेष, मतभेद, भांडणे तंटे, मत्सर अथवा नको ते प्रकार सुरू असतील तेथे चुकूनही अन्नग्रहण करू नये. पण जर एखाद्याने प्रेमाने अथवा सात्त्विक वृत्तीने दिलेले अन्न अथवा कोणताही पदार्थ निश्चितच दुसऱयाची प्रगती करतो व ते अन्न लाभते. मंगलकार्यातदेखील याचे अनुभव येत असतात. त्यासाठीच अन्न शिजविणारे कुणीही असोत त्यांची मनःस्थिती प्रसन्न असेल तर ते अन्न प्रसादाप्रमाणे पवित्र होते.
मेष.
अनंत चतुर्दशी लाभात होत आहे. कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे काम त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. गणेशाच्या कृपेने निश्चितच काहीतरी लाभ होतील. राशीच्या बाराव्या स्थानी पितृपक्ष आरंभ होत आहे. पूर्वजांच्या काही आशा आकांक्षा, इच्छा असतील व त्या अनुषंगाने काही गुप्त व बाधित त्रास असतील तर त्याच्या निवारणार्थ या पितृपक्षात पूर्वजांच्या श्राद्ध कर्माला प्राधान्य द्या. बऱयाच समस्या सुटतील व त्यांचा आशीर्वादही लाभेल.
वृषभ.
अनंत चतुर्दशी दशमात होत आहे. नोकरी-व्यवसायात काही अडचणी असतील, उपजीविकेचे साधन मिळत नसेल, मातापित्यांच्या आरोग्याची काळजी असेल तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे व्यवस्थित पूजन करा. वरील समस्या सुटण्यास मदत होईल. लाभस्थानी पितृपक्षाचा आरंभ ही चांगली घटना आहे. जर तुमचे पूर्वज शांत असतील तर तुमच्या आयुष्याला सोन्याची झालर लागेल पण जर शांत नसतील तर प्रत्येक कामात अडथळे जाणवतील. त्यासाठी श्राद्धकर्माद्वारे त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन.
भाग्योदयात येणारे अडथळे, कार्याचा खोळंबा, विवाह न जमणे, एखादी वस्तू अथवा व्यक्ती हरवलेली असेल तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे कोणतेही प्रभावी स्तोत्र एकवीस वेळा वाचावे. वरील समस्या सुटण्यास मदत होईल. दशमस्थानी पितृपक्षाची सुरुवात होत आहे. नोकरीविषयी काही अडचणी असतील, कोणतीही कामे होत नसतील तर घराण्यातील पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांचे श्राद्धकर्म व्यवस्थित करा. आपोआप काहीतरी मार्ग दिसत जाईल व संकटमुक्त व्हाल.
कर्क.
वडिलोपार्जित इस्टेट, विम्याची रक्कम अथवा काही महत्त्वाच्या कागदपत्राद्वारे मिळणारे लाभ होत नसतील, जिवावरचे कठीण प्रसंग अशा चक्रव्यूहात सापडला असाल तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे मंत्र अथवा स्तोत्र जास्तीत जास्त वाचा. परदेश प्रवासातील अडचणी, मानसिक संभ्रम, नोकरीची अनिश्चितता, सासरी होणारे जाच तसेच बदनामी आणि गुप्त शत्रुत्व असे अनुभव येत असतील तर पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कर्मे व्यवस्थित करा. अनेक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल.
सिंह.
विवाहात येणारे अडथळे, पती-पत्नीतील मतभेद, भागीदारी व्यवसायात नुकसान, प्रवासात हानी, कोर्ट प्रकरणात अपयश अशा गोष्टी घडत असतील तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे सहस्रनाम वाचण्यास सुरुवात करा. बऱयाच अडचणीतून मुक्त व्हाल. घराण्यात कुणाच्या हातून पाणी व अन्न यांचा अपमान झालेला असेल व त्याच्या परिणामाने प्रगती होत नसेल, आरोग्याच्या तक्रारी असतील तर या पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने तुमच्या परंपरेनुसार शास्त्राsक्त श्राद्धविधी करून घ्या. त्यांची कृपा होईल
कन्या
आरोग्याच्या तक्रारी, नातेवाईकातील गैरसमज, गुप्त शत्रु पीडा, मानसिक आघात, नोकरी-व्यवसायात येणारे अडथळे असे प्रकार घडत असतील तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे कोणतेही स्तोत्र वाचून त्याचा अनुभव पहा. काही कारणाने वैवाहिक जीवनात निर्माण झालेले गैरसमज, शत्रुत्व, आर्थिक अडचणी, इतरांच्या हस्तक्षेपामुळे नको ती प्रकरणे मागे लागलेली असतील तर पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून तुमच्या परंपरेनुसार श्राद्ध कर्म करा. अनेक गोष्टीचे मर्म लक्षात येईल.
तूळ
शिक्षण व संततीच्या बाबतीत येणारे अडथळे, कुलदेवाचा प्रकोप, पती-पत्नीतील दुरावा असे अनुभव येत असतील तर अनंत चतुर्दशीला संतान गणेश किंवा तत्सम कोणतेही गणपती स्तोत्र वाचा. बऱयाच समस्या सुटत जातील. चुकीचे औषध निदान, गुप्त शत्रुत्व, मामा मावशी याना होणारे त्रास, आरोग्याच्या तक्रारी, आर्थिक फसवणूक असे अनुभव येत असतील तर या पितृपक्षात पूर्वजांचे काही चुकले आहे का ते पहा व त्यानुसार उपाययोजना केल्यास बरीच संकटे कमी होतील व पूर्वजांची कृपाही लाभेल.
वृश्चिक.
वास्तु संदर्भातील कामात येणारे सर्व अडथळे, जमीन, विहीर, बोअर यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणी, कागदोपत्री व्यवहारातील गोंधळ, घर मालक व भाडेकरू यांच्यातील वैमनस्य असे प्रकार घडत असतील तर अनंत चतुर्दशीला गणपती अथर्वशीर्ष जास्तीत जास्त वेळ वाचण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या तरी सहाय्याने प्रश्न सुटत जातील. संतती समस्या, शिक्षण व दैनंदिन कामात येणारे अडथळे, लहरीपणा, मानसिक ताण तणाव असे प्रकार अनुभवत असाल तर पितृपक्षात घराण्यातील पूर्वजांचे कृपेसाठी त्यांचे श्राद्ध कर्म व्यवस्थित ठेवा. बऱयाच अडचणीतून आपोआप सुटका होऊन जाईल.
धनु
भगीरथ प्रयत्न करूनही न होणारी काही कामे या आठवडय़ात होत जातील. अनंत चतुर्दशीला गणेशाचे कोणतेही स्तोत्र वाचा, त्याची कृपा लाभेल व अनेक अडचणीतून मार्ग दिसू लागेल. राहत्या वास्तूत काही बाधिक प्रकार होत असतील, कोणतेच काम होत नसेल, आर्थिक अडचणी, गैरसमज यासह काही अडचणी असतील तर या पितृपक्षात पूर्वजांच्या श्राद्ध कर्माला प्रथम प्राधान्य द्यावे. त्यांच्या कृपेने तुमची अडलेली कामे होऊ लागतील.
मकर
डोळय़ांचे विकार, दृष्टीदोष, आर्थिक व्यवहारातील किचकट समस्या, नको ती जबाबदारी पडणे असे प्रकार घडत असतील तर अनंत चतुर्दशीला गणेशाचे कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणण्यास सुरुवात करा. संकटांचे परस्पर निवारण होईल शेजारी व नातेवाईकात मतभेद, नोकरीविषयक व्यवहारात अपेक्षित उत्तरे येत नसतील, शारीरिक विकार असतील तर या पितृपक्षात पूर्वजांची श्राद्ध कर्मे व्यवस्थित करा. त्यांच्या कृपेने कितीही संकटे आली तरी त्यातून निश्चितच मुक्त व्हाल
कुंभ.
शारीरिक आजार, मानसिक स्वास्थ्य, अनामिक हुरहुर किंवा सतत भीती वाटत राहणे, आत्मविश्वास कमी असेल तर अनंत चतुर्दशी या शुभतिथीला गणेश पूजन करून कुलदेवाचे कोणतेही स्तोत्र वाचन करावे. आर्थिक व्यवहार सुरळीत होत नसतील, नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल, तुमच्या प्रगतीवर जर कुणाची नजर असेल, शिक्षण व नोकरी व्यवसायात यश नसेल तर पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध विसरू नका. त्यांचे स्मरण, पूजन तुम्हाला अनेक संकटातून मार्ग दाखवील.
मीन.
आध्यात्मिक प्रगतीत येणारे अडथळे, गुप्त शत्रूंचा त्रास, व्हिसा किंवा विदेश व्यवहारात येणाऱया अडचणी, कर्ज वाढणे असे प्रकार अनुभवत असाल तर अनंत चतुर्दशीदिवशी गणेशाचे मंत्र किंवा स्तोत्र म्हणून त्याची पूजा करा. बऱयाच अडचणी कमी होऊ लागतील. पितृपक्ष तुमच्या राशीत सुरू होत आहे. पूर्वजांच्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी त्यांचे श्राद्धकर्म करण्याकडे विशेष लक्ष द्या कारण ते शांत नसतील तर कोणतीही कामे सुरळीत पार पडत नाहीत.