प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वयंरोजगार व शहराची गरज ओळखून कोल्हापूरातील प्रशिक्षित व परवानाधारक गरजू महिलांना नवीन वर्षात मोफत रिक्षा देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
माणिक पाटील(चुयेकर) यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी महिलांना मोफत रिक्षा देण्याची घोषणा केली.कोल्हापूरातील महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे यांना काही महिन्यापूर्वी प्रोत्साहनपर मोफत रिक्षा दिली आहे.त्यांच्यावर गरजू महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून परवाना घेतलेल्या सर्व महिलांना मोफत रिक्षा देण्यात येणार आहेत. यासाठी रेखा दुधाणे यांच्याशी 9762791897 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर,कोल्हापूर इंजिनिअर्स आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे,प्राचार्य क्रांतीकुमार पाटील,चाटे समूहाचे भरत खराटे,डॉ.संदीप पाटील,वैशाली पाटील,संतोष शेखरदास,रेखा शंकरदास,राजेंद्र शहा,राजेंद्र मकोटे,तुषार भिवटे उपस्थित होते.