बेंगळूर / प्रतिनिधी
मौलाना शफी सादी यांची वक्फ बोर्डाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. सादी कर्नाटक मुस्लिम जमातचे सरचिटणीस देखील असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आसिफ अली शेख हुसेन यांचा पराभव केला. मौलाना शफी सादी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी बुधवारी बेंगळूर येथे अभिनंदन केले.
वक्फ मंत्री कार्यालय मौलाना शफी सादी यांनी बुधवारी कर्नाटक राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, ते या पदावर निवडून आलेले पहिले भाजप-समर्थित सदस्य बनले आहेत. बुधवारी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. कर्नाटक मुस्लिम जमातचे सरचिटणीस असलेल्या सादी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आसिफ अली शेख हुसेन यांचा पराभव केला. प्रादेशिक आयुक्तालयाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीवर देखरेख करणार्या प्राधिकरणाच्या दहा मंडळ सदस्यांपैकी सादी आणि हुसैन हे दोनच प्रमुख पदासाठी स्पर्धक होते.
“मौलाना शफी सादी यांना समाजात खूप सद्भावना आहे. आम्हाला आशा आहे की ते भाजप आणि मुस्लिम समुदायातील दरी कमी करतील, ज्याची यावेळी सर्वात जास्त गरज आहे,” कायदा मंत्री जे.सी.मधुस्वामी म्हणाले. सादी यांच्या कार्यकाळात प्रलंबित फायली निकाली काढण्यात आणि वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमण काढण्यास राज्य सरकार मदत करेल, असेही ते म्हणाले. कर्नाटक स्टेट बोर्ड ऑफ वक्फ, एक वैधानिक संस्था, मशिदी दर्गा, इदगाह, मुस्लिम दफनभूमी आणि इतर अनाथाश्रमांसह राज्यातील इस्लामिक धार्मिक संपत्तीचे निरीक्षण आणि नियंत्रण करते.
या वर्षाच्या सुरुवातीलाच ही निवडणूक झाली होती ज्यामध्ये मंडळाचे सदस्य मोहम्मद युसूफ विजयी झाले. पण, कोविड -19 मुळे त्याचा मृत्यू झाला आणि हे पद रिक्त झाले होते. अधिकृतपणे कोणत्याही राजकीय पक्षाने मंडळाच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे करण्याची तरतूद नसली तरी, पक्षाशी संलग्न उमेदवार निवडणूक लढवू शकतात. मौलाना शफी सादी यांच्या निवडीवर भाष्य करताना, मुझराई, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी मंडळाला मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मंडळाने आपल्या मुलांच्या आणि महिलांच्या कल्याणावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.