1 टक्के धनाढ्यांकडे २२ टक्के संपत्ती; देशातील ५० टक्के लोकसंख्येकडे उत्पन्नाचा केवळ १३ टक्के वाटा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारत हा अनेक धर्माच्या नागरिकांनी मिळून बनलेला देश असून स्वातंत्र्यापासून ते आजतागायत राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्त्वानुसार निधर्मी आहे. कोरोनासह अनेक कारणांनी देशातील कमी होत चाललेल्या रोगाच्या संधीमुळे सामान्य नागरिक दिवसें – दिवस कंगाल होत आहे. तसेच गेल्या दोन दशकात कोणत्या ना कोणत्या कारणाने देशातील धार्मिक समुदायात विषमतेकडे वळत असल्याची निरीक्षणे अनेक समाज तज्ज्ञांनी आपली नोंदवली आहेत. याच घटकांना पुष्ठी देणारा जागतिक विषमता अहवाल २०२२ जाहीर झाला आहे. या अहवाल २०२२ नुसार २०२० मध्ये देशाचे जागतिक उत्पन्न अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे.
या अहवालात भारताला मोठा धक्का बसला असुन भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच भारत एक असा देश आहे जिथे लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात ५७ टक्के वाटा आहे. तर खालच्या ५० टक्के विभागाचा केवळ १३ टक्के वाटा आहे, असे म्हटले आहे. हा अहवाल वर्ष २०२१ वर आधारित आहे. यात असाही दावा करण्यात आला आहे की २०२० मध्ये देशाचे जागतिक उत्पन्नही अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे. जागतिक असमानता अहवाल २०२२’ हा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे जे ‘वर्ल्ड इनक्वालिटी लॅब’ चे सह-संचालक आहेत. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत आता जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
तसेच अहवालात म्हटले आहे की भारतातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न २,०४,२०० रुपये आहे. तर खालच्या स्तरातील (५० टक्के) उत्पन्न ५३,६१० रुपये आहे. लोकसंख्येच्या १० टक्के लोकांचे उत्पन्न जवळपास २० पट आहे म्हणजेच ( ११,६६,५२० रुपये) यापेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, भारतातील १० टक्के लोकसंख्येकडे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के वाटा आहे, तर एक टक्का लोकसंख्येकडे २२ टक्के आहे. त्याच वेळी, तळाच्या ५० टक्के लोकसंख्येचा वाटा केवळ १३ टक्के आहे. भारत हा गरीब आणि उच्चभ्रूंनी भरलेला अत्यंत असमान देश आहे, असेही त्यात म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की भारतात लैंगिक असमानता खूप जास्त आहे. महिला कामगारांच्या उत्पन्नाचा वाटा १८ टक्के आहे.