वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातून निर्यात होणाऱया औषधांच्या प्रमाणात 18 टक्के इतकी वाढ आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये दिसून आली आहे. भारताने 24.44 अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात केली असून यात अमेरिकेला जास्त औषधे निर्यात केली असल्याचे समोर आले आहे.
मागच्या म्हणजेच आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 20.58 अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात करण्यात आली होती. उत्तर अमेरिकेत सर्वाधिक औषधे पाठवण्यात आली आहेत. निर्यातीत उत्तर अमेरिकेचा वाटा 34 टक्के इतका राहिला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेत औषधाची निर्यात जास्त झाली असून हे प्रमाण 28 टक्के आणि युरोपिय बाजारात निर्यात 11 टक्के वाढीव झाली आहे. मार्च 2021 मध्ये औषधांची निर्यात एकदम वाढल्याचे दिसून आले आहे.
2.3 अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात या महिन्यात झाली आहे. इतर महिन्यांच्या तुनेत मार्चमधील निर्यात सर्वाधिक गणली जात आहे. 2020 च्या मार्चमध्ये निर्यात 1.54 अब्ज डॉलर्सच्या औषधांची राहिली आहे.
मागच्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने याचा परिणाम अर्थातच निर्यातीवर दिसला. गुणवत्ता चांगली असल्याने भारतीय औषधांना विदेशात मागणी वाढताना दिसते आहे. येणाऱया काळात कोरोनावर पर्याय म्हणून कोरोना लसींच्या निर्यातीतही वाढ होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.