वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै 1 ते 21 पर्यंतच्या काळामध्ये भारतातून होणाऱया निर्यातीचे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. रत्ने, दागिन्यांसह पेट्रोलियम आणि अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात सदरच्या कालावधीमध्ये मोठय़ा प्रमाणात झाली असल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे आयातदेखील वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातून जवळपास 28.48 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. आयातीमध्येही साधारण 64 टक्के इतकी वाढ होऊन 31 अब्ज डॉलर्सची आयात झाली असल्याची बाब समोर आली आहे. 9.29 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूटही यावेळी दिसून आली आहे. पेट्रोलियम, प्रुड आदी उत्पादनांची आयात मोठय़ा प्रमाणात झाली असल्याचे दिसून आले आहे. अमेरिका, युनायटेड अरब अमिरात व ब्राझील या देशांना 51 टक्के अधिकची निर्यात करण्यात आली आहे.