नवी दिल्ली
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलने आर्थिक वर्ष 2021 मधील आपले उत्पन्न जवळपास एक तृतीवंशने वधारत बाजारात मजबूत स्थान प्राप्त करत आहे. यामध्ये भारत आणि व्हिएतनाम मधील व्यवसाय हा दुप्पट झाला आहे. अशी माहिती कंपनीचे मुख्य अधिकारी टिम कुक यांनी दिली आहे.
अमेरिकन कंपनीने 25 सप्टेंबर 2021 रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत वर्षांच्या आधारे 29 टक्क्यांनी वधारत 83.4 अब्ज डॉलरचा नफा कमाई केली आहे. तिमाहीत त्यांचे निव्वळ उत्पन्न 20.55 अब्ज डॉलर होती.
सर्व क्षेत्रात आम्ही मजबूत आकडेवारी प्राप्त केली असून दोन अंकी वृद्धीचे आकडे आम्ही प्राप्त केले असून प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात तिमाहीत विक्रम प्राप्त करण्यावर भर दिला असल्याचे म्हटले आहे. यामुळे आगामी काळातही यामध्ये सकारात्मक काम करणार असल्याचा विश्वास सीईओ टीम कुक यांनी व्यक्त केला आहे.