- जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे, अमेरिका आणि ब्रिटन नंतर भारताचा क्रमांक आहे.
18 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 8 वाजेपर्यंत 94 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.
आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत 1,99,305 सत्रात 94,22,228 जणांनी लस घेतली आहे.
यामध्ये 61,96,641 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ) 3,69,167 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ) आणि 28,56,420 आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा ( पहिली मात्रा ) समावेश आहे.
कोविड -19 लसीकरणाची दुसरी मात्रा 13 फेब्रुवारी 2021 पासून सुरु झाली, पहिली मात्रा घेऊन 28 दिवस झालेल्यांना ही दुसरी मात्रा देण्यात येत आहे. 2 फेब्रुवारी 2021 पासून आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले.
भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज ही संख्या 1.06 कोटी (1,06,56,845) आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32% आहे.बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने मृत्युच्या दैनंदिन संख्येत आणि त्याच बरोबर सक्रीय रुग्ण संख्येतही घट होत आहेत.
भारताची सध्याची सक्रीय रुग्ण संख्या (1,37,342) असून ही संख्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.25 % इतकी आहे.