ऑनलाईन टीम / तरुण भारत
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन विषाणू आता भारतातही आढळला असुन गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आणि चिंतेत भर घालणारा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा करोना विषाणू आता भारतातही आढळून आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन चे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमिक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटने हाहकार उडवला आहे.
यामुळे पुन्हा एकादा काही देशांना पुन्हा लॉकडाउनकडे वळावे लागले आहे. दोन दिवसापुर्वी संसदेत दिलेल्या माहितीनुसार भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला नसल्याचे सांगितले होते. मात्र आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे.