ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांनी 70 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासात 74 हजार 383 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 70 लाख 53 हजार 807 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 8 हजार 334 एवढी आहे.
सध्या देशात 8 लाख 67 हजार 496 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 60 लाख 77 हजार 977 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 8 कोटी 68 लाख 77 हजार 242 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 78 हजार 544 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.