पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानासह पुरवठा क्षेत्रात गुंतवणूकीचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस हे 15 जानेवारी रोजी भारत दौऱयावर आले आहेत. त्यांच्या आगमनापासून भारतात एका बाजूला व्यापार व उद्योग क्षेत्रावर सरकार सोबत चर्चा सुरु आहे. दुसऱया बाजूला देशात विविध भागात मोठय़ा प्रमाणात त्यांच्या विरोध करण्यात येत आहे. परंतु यावर दिलासादायक बाब म्हणजे आगामी पाच वर्षांत ऍमेझॉन 10 लाख नवीन रोजगार निर्मितीची योजना आखणार असल्याचे जेफ बेजोस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या माहितीनुसार ऍमेझॉनकडून 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक येत्या काळात करणार यांचा लाभ देशातील उद्योग क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात होणार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले आहे.
विविध क्षेत्रात रोजगार
भारतात तंत्रज्ञान, पुरवठा नेटवर्कची उभारणी (लॉजिस्टिक) आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये येत्या काळात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून कंपनी आगामी 5 वर्षात तब्बल 10 लाख नवीन रोजगार निर्मिती करणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश होण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे भारतामधील प्रदूषण आणि हवामान बदलासंदर्भातील घडामोडीवर लढण्यासाठी ऍमेझॉन इलेक्ट्रिक रिक्षा तयार करण्याच्या तयारीत आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे 10 हजार इ-रिक्षाची निर्मिती करणार आहे.