ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 85 लाख 53 हजार 657 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 79 लाख 17 हजार 373 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मागील 24 तासात देशात 45 हजार 903 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 490 रुग्णांचा मृत्यू झाला. 85.53 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 5 लाख 09 हजार 673 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 26 हजार 611 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात आतापर्यंत 11 कोटी 85 लाख 72 हजार 192 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 35 हजार 401 कोरोना चाचण्या रविवारी (दि.8) एका दिवसात करण्यात आल्या.