वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉकमध्ये झालेल्या दुसऱया आशियाई युवा महिलांच्या बीच हँडबॉल स्पर्धेचे रौप्यपदक भारताने पटकाविले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने दोनवेळा हाँगकाँगचा पराभव केला तर यजमान थायलंडविरूद्ध त्यांनी एक सामना जिंकला तर दुसरा सामना गमविला. सदर स्पर्धा 25 ते 30 एप्रिल दरम्यान झाली. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने दुसऱया स्थानासह रौप्यपदक पटकाविले. भारतीय युवा महिला संघ आता आगामी होणाऱया विश्व युवा बीच हँडबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे.