ऑनलाईन टीम / मुंबई :
देशभरात झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतीय नौदलात आता शिरकाव केला आहे. मुंबई नौदलातील तब्बल 21 जवानाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय नौदलात कोरोना व्हायरस ची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा आयएनएस हा तळ आहे. या तळावर नौसैनिकांची घरे आहेत. दरम्यान, या सर्व जवानांना आता मुंबईतील नौदल रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. या जवानाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून कडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या मते, सात एप्रिल रोजी नौदलातील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आणि त्याच जवानापासून या सर्व जवानांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. नौदलाच्या युद्धनौकांवरील तैनात सैनिक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.