ऑनलाईन टीम / कोलकाता :
बांग्लादेशची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तस्कराचा BSF च्या कारवाईत मृत्यू झाला.
माल्दा जिल्ह्यातील गोपालनगर चौकीजवळ BSF ची एक तुकडी गस्त घालत होती. तिथे शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सीमेजवळील कुंपणाजवळ 10 ते 12 बांग्लादेशी आणि भारतीय तस्करांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना BSF च्या जवानांनी थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी तस्करांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेन्सेडिल कफ सिरपच्या 75 बाटल्या आणि 10 धारधार शस्त्र कुंपणात फेकून पळ काढला.
सीमारेषेवरून पळून जाताना त्यामधील एका तस्कराने BSF जवानावर चाकू हल्ला केला. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी जवानाने केलेल्या गोळीबारात तस्कर ठार झाला.