भावाने केले होते व्हॉट्सऍपवर ब्लॉक
भावाबहिणीदरम्यान रुसवाफुगवा सुरूच असतो. परंतु केरळमध्ये एक भाऊ बहिणीवर इतका नाराज झाली की त्याने तिला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केले. बहिणीला हे समजताच तिने स्वतःच्या 21 वर्षीय भावाची मनधरणी करण्यासाठी केलेली कृती चर्चेचा विषय ठरली आहे. ही घटना इडुक्की जिल्हय़ातील आहे. येथे राहणारी कृष्णप्रिया नावाच्या इंजिनियर युवतीने स्वतःच्या छोटय़ा भावाची माफी मागण्यासाठी बिलिंग रोलवर 434 मीटर लांब पत्र लिहिले आहे. याचे वजन सुमारे 5 किलोग्रॅम आहे. हे पत्र लिहिण्यासाठी सुमारे 12 तास लागल्याचा कृष्णप्रियाचा दावा आहे.
यंदाच्या ‘ब्रदर्स डे’वेळी छोटा भाऊ कृष्णप्रसाला शुभेच्छा देण्यास विसरले होते. याचमुण्s नाराज होत त्याने व्हॉट्सऍपवर ब्लॉक केले. त्याची मनधरणी करण्यासाठी लांब आणि भरभक्कम पत्र लिहिल्याचे कृष्णप्रियाने सांगितले. युनिव्हर्स रिकॉर्ड फोरमनुसार कृष्णप्रियाने आतापर्यंतचे सर्वात लांब पत्र लिहिले आहे.
कृष्णप्रसादने स्वतःच्या बहिणीला काही मेसेज पाठविले होते, याकडे कृष्णप्रियाने लक्ष दिले नव्हते. बहिणीने ब्रदर्स डेच्या शुभेच्छा न दिल्याने नाराज कृष्णप्रसादने तिला व्हॉट्सऍपवर ब्लॉक करून टाकले. भावाशी बोलण्याची इच्छा अनावर होत असल्याने तिने 25 मे रोजी त्याच्यासाठी पत्र लिहिणे सुरू केले. प्रथम तिने ए4 साइजचा कागद घेतला, परंतु लवकच्रा तिला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा कागद अपुरा ठरेल याची जाणीव झाली. मग मोठा कागद न मिळाल्याने तिने बिलिंग रोलवरच पत्र लिहिण्यास सुरुवात केली. तिने 15 रोल खरेदी केले आणि सर्वांवर स्वतःच्या भावना व्यक्त केल्या, याकरता तिला 12 तास लागले आहेत.
सर्वात लांब पत्र
हे पत्र पॅक करणे तिच्यासाठी आव्हानात्मक होते, कारण प्रत्येक रोलची लांबी सुमारे 30 मीटर होती. अशा स्थितीने तिने कशाप्रकारे तरी पत्र एका बॉक्समध्ये पॅक केले. पोस्ट ऑफिसमध्ये या बॉक्सचे वजन 5.27 किलो असल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांनी हे पत्र कृष्णप्रसादला मिळाले, तेव्हा त्याला प्रथम हा बर्थडे गिफ्ट असल्याचे वाटले होते. तर कृष्णप्रियाने या पत्राकरता ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला आहे.