बेंगळूर : दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने 9 जिल्हाधिकाऱयांसह 41 आयएएस अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होता. मंगळवारी पुन्हा पाच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. आयपीएस अधिकारी भास्करराव यांची रेल्वे पोलीस विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर प्रशांतकुमार ठाकुर यांची लोकायुक्त विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बदली झाली आहे. डॉ. एस. मूर्ती यांची कर्नाटक राज्य पोलीस वसती निगमच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर वर्णी लावण्यात आली आहे. तसेच डॉ. के. रामचंद्रराव यांची बीएमटीएफ (बेंगळूर मेट्रोपॉलिटीन टास्क फोर्स) च्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी तर अरुण चक्रवर्ती यांची अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
Previous Articleमंगाई अनगोळ संघाकडे वरदराज चषक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.