राजकुमार राव नायकाच्या भूमिकेत
दिग्दर्शक अनुभव सिन्हा स्वतःचा आगामी चित्रपट ‘भीड’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच अनुभव सिन्हासोबत काम करणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे. ‘भीड’मध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरची एंट्री झाली आहे.
अनुभव सिन्हाने लॉकडाउनदरम्यान आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘अनेक’चे चित्रिकरण संपले आहे. अनुभव आता स्वतःच्या टीमसोबत ‘भीड’चे चित्रिकरण सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्याने अलिकडेच टीमसोबत लखनौमध्ये चित्रिकरण स्थळांचा आढावा घेतला आहे.
चित्रपटाचे कलाकार दिवाळीनंतर या चित्रपटाशी जोडले जातील. चित्रिकरण दिवाळीनंतर लखनौमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू झाले आहे. भीड हे चित्रपटाचे शीर्षक ऐकताच पूर्ण टीम उत्साह संचारला होता, याचमुळे हे नाव नक्की झाल्याचे अनुभवने म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमी आणि राजकुमार यांची नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.