कुडाळ / वार्ताहर-
तालुक्यातील बिबवणें – पळसेवाडी येथील रहिवासी व भूमि अभिलेख विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी गोपाळ उर्फ बबन लक्ष्मण कुबल ( ६२ ) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कुडाळ येथील भूमि अभिलेख कार्यालयात त्यानीं बरीच वर्षे काम केले. नंतर वेंगुर्ले येथील कार्यालयात तीन वर्षे सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले. आपल्या कार्यालयीन कामात ते तत्पर असायचे. लोकांना चांगली व प्रामाणिक सेवा दिली. शांत व प्रेमळ स्वभावामुळे त्यानीं जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, आई, दोन भाऊ, बहीण,वहिनी, भावोजी ,पुतणे,पुतणी, जावई ,काकी,चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे. रेल्वे कर्मचारी अमित कुबल यांचे ते वडील,तर वेंगुर्ले – उभादांडा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर कुबल व बिबवणे हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश कुबल यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.