वृत्तसंस्था/ लिस्बन
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू रूबेन डायस यापूर्वी बेनफिका एफसी क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता. आता बेनफिका एफसी क्लबने रूबेन डायसची मँचेस्टर सिटी क्लबला विक्री करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याच प्रमाणे अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू निकोलास ओटामेंडी बेनफिका क्लबमध्ये दाखल होणार आहे.
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱयाह मँचेस्टर सिटी संघाबरोबर बेनफिका एफसीने रूबेन डायस संदर्भात करार करताना 68 दशलक्ष युरोस (79.2 दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आहे. बेनफिकाने डायसची विक्री करताना बरीच मोठी रक्कम मँचेस्टर सिटीकडून घेतली आहे. दरम्यान मँचेस्टर सिटी संघातील अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू ओटमेंडी याला खरेदी करताना बेनफिका एफसी संघाने मँचेस्टर सिटीला 15 दशलक्ष युरोसची रक्कम दिली आहे. 23 वर्षीय डायसने आतापर्यंत 19 सामन्यांत पोर्तुगालचे प्रतिनिधीत्व केले आहे.