तिसवाडी / प्रतिनिधी
मडगाव येथील ई एस आई इस्पितळस्थित कोविड इस्पितळाचा ताण कमी करण्यासाठी कोरोनाबाधित गर्भवती महिला, प्रसूत झालेल्या महिला व बाल sरुग्णांना मंडूर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात हलविण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शविला असून या संदर्भातील ग्रामस्थां®³ाा सह्यांचे निवेदन आजोशी मंडूर पंचायतीतर्फे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. मंडूर आरोग्य केंद्रात कोविड सेंटर होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानांवर वर्तमानपत्रात हल्लीच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.या अनुषंगानं पंचायतीने दिनांक 31जुलै रोजी मंडूर येथे ग्रामस्थां®ााr सभा बोलावली होती.यात ग्रामस्थां®ाs मत जाणून घेतले होते.यात बहुतेकांनी कोविड सेंट्ररला विरोध दर्शविला.आजोशी मंडूरच्या सरपंच प्रणिशा नाईक यांच्या नेत्रूत्वाखाली ही सभा मंडूर पंचायती समोर संपन्न झाली होती.उपसरपंच सिप्रियान आफोंसो,माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य अजित बकाल,फ्रान्सिस पो व पोउलीन पो हे पंचसदस्यांची उपस्थिती होती.
या सभेला ग्रामस्थांनीही चांगली उपस्थिती लावली.कोविड सेन्टर म्हणून या मंडूर ग्रामीण आरोग्य केंद्राचा वापर झाल्यास या परिसराला धोका निर्माण होऊ शकतो.ही भीती असल्याने हे कोविड इस्पितळच येथे आणू नये असा एकंदरीत सूर या सभेतील वक्त्यांनी व्यक्त केला.अरुणा विष्णू वाघ,महेंद्र शिरोडकर,रामराव वाघ,सायमन कायादो,जगदीश बांदोडकर,आनंद गावकर, विठू नार्वेकर आदींनीही येथे आपापले मत मांडले.स्थानिक सांत आंदे मतदार संघाचे आमदार सिल्वेरा यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी .यासाठी त्यांच्या विरोधात काहींनी भाष्य केले.
जेव्हा जेव्हा हे ग्रामीण आरोग्य केंद्र येथून हलविण्याचा प्रयत्न झाला.तेव्हा तेव्हा स्थानिक लोकांना रस्त्यावर येण्यास सरकारने भाग पाडले.दोन तीन वेळा सरकारचा हा डाव ग्रामस्थांनी हाणून पाडला होता.आता या आरोग्य केंद्रांत कोविड सेंटर सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.विद्यमान ग्रामीण आरोग्य केंद्र हे भरवस्तीत असून ते चालू स्थितीत आहे.सरकारचा हा निर्णय मोठय़ा संख्येतील लोकांना मान्य नाही.
सरकारचा मंडूर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात कोविड सेन्टर सुरु करण्याचा विचार असल्यास येथील गावचे हित लक्षात घेऊन स्थानिक पंचायतीचा त्यास सरपंच म्हणून आपला नक्कीच विरोध असेल.या पंचायतीच्या सर्व पंचायत सदस्यांचा यास पाठिंबा असल्याचे सरपंच प्रणिशा नाईक यांनी आपल्या माहितीत सांगितले.उपसरपंच सिप्रियान आफोंसो,माजी सरपंच अजित बकाल,पावलीन पो, फ्रान्सिस पो आदींनीही याला आपला विरोध असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले.
दरम्यान कोरोनाबाधित गर्भवती महिला, प्रसूत झालेल्या महिला व बाल रुग्णांसाठी मंडूर ग्रामिण आरोग्य केंद्रात कोविड सेन्टर सुरु कराण्यास आजोशी,मंडूर, डोंगरी, नेवरा, करमळी परिसरातील मोठय़ा संख्येतील ग्रामस्थां®ाा जोरदार विरोध असल्याचे दि.31जुलै रोजी घेण्यात आलेल्या सभेत स्पष्ट झाले होते.या कोविड सेंटरला विरोध दर्शविणारे स्थानिक ग्रामस्थां®³ाा सह्यांचे लेखी निवेदन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना उद्या सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी आजोशी मंडूर ग्रामपंचायतीतर्फे सादर करण्यात येणार आहेत.याच्या प्रति आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सांत आंदे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा,गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बांबोळी,मेडिकल ऑफीसर मंडूर हेल्थ सेन्टर आणि हेल्थ सेपेटरी यांनाही पाठविण्यात येणार आहेत.अशी खात्रीलायक माहिती आजोशी मंडूर पंचायतीतर्फे देण्यात आली आहे.