मंड्या/प्रतिनिधी
मंड्या केआरपेट तहसीलच्या गुबानहळ्ळी गावात शेतात वारंवार बिबट्याचा वावर होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर पाच वर्षांचा नर बिबट्या शुक्रवारी पिंजऱ्यात अडकला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
गुबानहळ्ळी गावात दोन आठवडे बिबट्या शेतात दिसल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी एच. गंगाधर यांना मिळाली. गुरुवारी रात्री शेतकरी चंद्ररप्पा यांच्या ऊस शेतात एक पिंजरा ठेवण्यात आला. पिंजऱ्यात कुत्रा पाहून शिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या पिंजऱ्यात अडकला. यांनतर वनविभागाच्या पथकाने या बिबट्याला अभयारण्यात सोडून दिले.