मंड्या/प्रतिनिधी
बुधवारी मंड्या जिल्ह्यातील मालवळ्ळी तालुक्यातील लिंगापट्टन गावातल्या श्री मराम्मा मंदिरात प्रसाद खाल्ल्यानंतर ७० हून अधिक भाविक आजारी पडले.
मंड्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर मंगळवारी संध्याकाळी मंदिरात विशेष पूजाचे आयोजन केले जाते आणि प्रसादाचे वाटप केले जाते. २७ ऑक्टोबर रोजी पूजा करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान बुधवारी उलट्या आणि अतिसाराने ७० लोक आजारी पडले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंड्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. मंचेगौडा यांनी प्रसादचे नमुने संकलित करुन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.