कुडचडे / प्रतिनिधी
कुडचडे-काकोडा पालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी झालेल्या गोंधळाचा निषेध म्हणून काल सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यानी कुडचडेचे आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी आपचे जेम्स फर्नांडिस, गॅब्रियल फर्नांडिस, वेलरॉईड फर्नांडिस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडचडेत जो प्रकार झाला त्याचा आप जाहीर निषेध करत आहे, असे त्यांनी सांगितले. नीलेश काब्राल यांनी स्वतःवर ताबा ठेवावा. कुडचडेतील जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी प्रवृत्त करू नये असे जेम्स फर्नाडिस म्हणाले. काब्राल यांनी राज्याचे नाव खराब केले आहे, असे सांगून त्यांच्या घरासमोर निदर्शने केल्यावर आपच्या कार्यकर्त्यांनी कुडचडेतील बाजारात रॅली काढून काब्राल यांच्या विरुध्द घोषणाबाजी केली व पत्रके वाटली.