प्रतिनिधी/ बेळगाव
जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बुधवारी न्यू गुड्सशेड रोड येथील विमल फौंडेशनच्या कार्यालयाला भेट दिली. कोरोनाच्या काळात विमल फौंडेशनने केलेल्या कार्याचे मंत्री जारकीहोळी यांनी कौतुक केले. तसेच कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी सेवा केलेल्या कार्यकर्त्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी विमल फौंडेशनचे अध्यक्ष व भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते मंत्री जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये सखल भागात पाणी शिरून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशा लोकांना सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. तसेच बेळगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी श्रीनिवास रेड्डी, अनुप काटे, संतोष पेडणेकर, गजेश नंदगडकर, प्रज्ञा शिंदे, अमृता कारेकर, प्रियंका कलघटकर, अमर सरदेसाई, बाळू जोशी, संजय कडोलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.