बेळगाव : मच्छे, भारतनगरनजीक खानापूर रोड महामार्गावर रस्त्याकडेला अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री घटना घडली असावी. परंतु मृत्यूबाबत संशय असल्याचे बोलले जात होते.
सदर व्यक्तीने अंगावर करडय़ा रंगाचे जॅकेट व निळी पँट घातलेली आहे. नजीकच एक निळय़ा रंगाचे जॅकेट पडलेले होते. त्या व्यक्तीच्या पायात चप्पल नाहीत.
उजव्या हातात दोन अंगठय़ा आहेत. वय सुमारे 40 वर्षे आहे. दरम्यान, मृतदेहाविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. वडगाव पोलिसांकडून सकाळी 10.30 वाजता पंचनामा करण्यात आला.