तक्रार मिळाल्यानंतर लगेच नगराध्यक्षांची कारवाई
प्रतिनिधी / मडगाव
सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याने न्यू मार्केट व गांधी मार्केट या मडगाव पालिकेच्या मालकीच्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या तसेच अन्य दुकानेही बंद आहेत. मात्र शहरातील काही इलेक्ट्रिक वस्तू विकणाऱयांची दुकाने खुली असल्याची तक्रार मिळाल्यावर नगराध्यक्षांनी अशी दुकाने बंद करण्याचे निर्देश मार्केट निरीक्षकांना दिले.
शहरी भागात तसेच अलंकार इमारतीनजीक अशी दुकाने खुली ठेवण्यात आल्याची तक्रार काहींनी आपल्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून दिली. आपण त्यावेळी पालिकेत उपस्थित होते. त्यामुळे तत्काळ मार्केट निरीक्षक व कामगारांच्या पथकाला घेऊन पाहणी केली असता काही इलेक्ट्रिक वस्तूंची दुकाने शटर अर्धे खुले ठेवून व्यापार करत असल्याचे आढळून आले. तेव्हा ती दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी सांगितले.
न्यू मार्केटमधील जीवनाश्यक साहित्याची विक्री करणारी तसेच किराणामालाची दुकाने खुली ठेवण्यास जिल्हाधिकाऱयांनी नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वस्तूंची व अन्य दुकाने खुली ठेवण्यास मुभा देणे शक्मयच नव्हते. मुख्याधिकाऱयांनी अशा प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी एक पथक नियुक्त करावे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.