दैवज्ञ भवनात होणार लोकप्रिय ‘रंगीला रास’दांडिया रास कार्यक्रम
प्रतिनिधी /मडगाव
मडगावात आज 8 रोजी दांडिया रास कार्यक्रम होणार असून त्यात दांडिया राणी व दांडिया राजाची निवड करण्यात येणार आहे.
मडगावच्या उड्डाण पुलाजवळ असलेल्या दैवज्ञ भवनात आज शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
दैवज्ञ समाज, मडगाव आणि श्री गुजराती समाज, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकप्रिय कार्यक्रमाचे दर वर्षी नाममात्र प्रवेश शुल्क घेऊन आयोजन केले जाते.
दांडिया क्वीन, दांडिया किंग, उत्कृष्ठ जोडपे, सिनीयर्स, (जुने ते सोने), लिटल चॅम्स, उत्कृष्ठ पेहराव (मुलगा/मुलगी), मिस्टर इनर्जेटीक, मीस इनर्जेटीक, उत्कृष्ठ मां-बेटी जोडींची या कार्यक्रमातून निवड करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मडगावात रंगत आणणाऱया या कार्यक्रमात अवश्य सहभागी होण्याचे आवाहन श्री गुजराती समाजाचे अध्यक्ष बलम संघानी तसेच दैवज्ञ भवनचे अध्यक्ष रामराव लोटलीकर यांनी आवाहन केले आहे.