ऑनलाईन टीम / इम्फाळ
भाजपने आपल्या रणनितीनुसार पुन्हा निवडणुकांआधी विरोधकांना मुख्य रणांगनापुर्वीच नामोहरम करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपने काँग्रेसच्या नेत्यांना फोडत भाजपमध्ये दाखल करणे सुरु केले आहे. काँग्रेसनेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. याला काही दिवस पुर्ण होता न होतात तोच मणिपूर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथऊजम यांनी आज दि. १ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काही दिवसांपुर्वी सचिन पायलट हे देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्या फोल ठरल्या असल्या तरी आता काँग्रेसला दुसरा मोठा झटका बसला आहे. गोविंददास कोंथऊजम याचा भाजपच्या दिल्ली कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसला निवडणुकांमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.