काकती पोलिसांची कारवाई : 6 हजार रुपयांसह 5 मोबाईल जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
मण्णूर डायट कॉलेजजवळ अंदर-बाहर जुगार खेळणाऱया आठ जुगाऱयांना रविवारी अटक करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी ही कारवाई केली असून सर्व आठ जणांवर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
डाएट कॉलेजजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून आठ जुगाऱयांना अटक केली. त्यांच्याजवळून 5 हजार 930 रुपये रोख रक्कम व पाच मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 87 व संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सचिन पुंडलिक मन्नोळकर (वय 32), कृष्णा लक्ष्मण हुंचीकर (वय 52), प्रसाद परशराम कदम (वय 26), महादेव शंकर डोणकरी (वय 40), परशुराम सिद्धाप्पा मुंगली (वय 30), प्रशांत आनंद बाळेकुंद्री (वय 23), कपिल कृष्णा डोळेकर (वय 22), श्याम शिवाजी डोणकरी (वय 28) सर्व राहणार मण्णूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.