तयारी महापालिका निवडणुकीची : राज्य निवडणूक आयोगाचे मनपा प्रशासनाला आदेश ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : एका मतदान केंद्रात जास्तीत जास्त 800 मतदार असणार
संजीव खाडे/कोल्हापूर
राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत एका मतदार केंद्रावर जास्तीत जास्त 700 ते 800 मतदार जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2015 च्या निवडणुकीत 81 प्रभागांसाठी 398 मतदान केंद्रे होती. यावेळी त्यात सुमारे 150 ते 200 मतदार केंद्रांची भर पडणार आहे. सर्व साधारणपणे एकूण मतदान केंद्रांचा आकडा हा 550 ते 600 पर्यत असणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. भारत निवडणूक आयोगाची 15 जानेवारी 2021 पर्यंतची मतदार यादी ही महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करताना ग्राहÎ धरण्यात यावी. 15 जानेवारी 2021 यादिवशी महाराष्ट्र विधानसभेची जी मतदार यादी अस्तित्वात असलेली ती यादी वापरण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर इतर काही निर्देशही दिले आहेत. त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एका मतदार पेंद्रावर 700 ते 800 मतदार जोडण्यात यावेत. त्यापेक्षा जादा मतदार असू नयेत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या 2015 च्या निवडणुकीच्या तुलनेत कमी होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या मात्र वाढणार आहे.
2015 मध्ये होती 398 मतदान पेंद्रे
2015 मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रभाग संख्या 77 वरून 81 पर्यंत वाढली होती. या सर्व प्रभागांच्या निवडणूकसाठी 398 मतदान केंद्रे निश्चित करण्यात होती. या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार संख्या 1000 किंवा 1200 ते 1500 दरम्यान होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्र हे 700 ते 800 मतदारांचेच असणार आहे. त्यामुळे 1000 किंवा 1200 ते 1500 मतदार संख्येऐवजी 700 ते 800 मतदार संख्येचे मतदान केंद्र महापालिका प्रशासनाला उभारावे लागणार आहे. परिणामी वाढणाऱया मतदार केंद्रांसाठी प्रभाग निहाय शाळा, कॉलेज, अथवा शासकीय कार्यालयाची इमारत शोधावी लागणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.
दृष्टीक्षेपात मतदान केंद्र व मतदार संख्या
निवडणूक वर्ष 2015 2021
प्रभाग संख्या 81 81
मतदान केंद्रे 398 500 ते 600
मतदान केंद्रातील मतदार 1000 ते 1500 700 ते 800
(2021 च्या निवडणुकीत मतदान केंद्र व मतदान केंद्रातील मतदार संख्या अंदजित आहे. त्यामध्ये थोडाफार संख्यात्मक बदल होऊ शकतो.)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदार संख्येच्या मर्यादेनुसार महापालिका प्रशासन मतदान केंद्रांची उभारणी करणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार केंद्रांची संख्या वाढणार आहे. –निखिल मोरे, उपायुक्त, को. म. न. पा.