प्रतिनिधी / बेळगाव
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखविण्यात आले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ज्या उमेदवाराच्या नावावर बटण दाबण्यात आले त्याचे नाव व्हीव्हीपॅटमध्ये कसे समोर येते ते दाखविण्यात आले. एकूणच लोकसभा पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी प्रात्यक्षिक दाखविले.
जिल्हाधिकारी कार्यालयात याची माहिती सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. निवडणूक आयोगाने दिलेले आदेश तसेच त्यांच्या मार्गसुचीनुसार निवडणूक प्रक्रियेचे काम पूर्ण करायचे आहे. यावेळी निवडणूक कर्मचाऱयांनाही मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बऱयाचवेळा वेगवेगळय़ा चर्चा आणि अफवा पसरविल्या जातात. मात्र निवडणूक प्रक्रियेचे काम कशाप्रकारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्या माध्यमातून होते त्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी डॉ. हरिषकुमार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी उपस्थित होते.