ऑनलाईन टीम / सिवनी :
मध्य प्रदेशात बुधवारी बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी एका हॉटेलमध्ये थांबलेल्या 5 लोकांकडून 1.25 कोटी रुपयांची सोने – चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. धाडीमध्ये सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोकांकडे सापडलेल्या रोख रक्कम व दागिन्यांचा कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार आढळून आला नाही.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश खरपुसे यांनी सांगितले की, कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री उशिराने धाड टाकली होती. यामध्ये पोलिसांना 5 लोकं सापडली. यातील तीन जण हे इंदौर मधील, तर दोघेजण हे पंजाब येथील तरणतारण मधील रहिवासी आहेत. त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले.
यामध्ये 44 किलो चांदी, 1.4 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 80 लाख रुपये आहे. त्याशिवाय 45.64 लाख रोख रक्कम देखील या लोकांकडून मिळाले आहेत. या लोकांचे म्हणणे आहे की, हे पंजाब मधील एका ज्वेलरचे आहेत.