ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील कुरावरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिवपुरा आणि गणूपुरा गावातील लोक गेल्या पाच दिवसांपासून पार्वती नदी पात्रात खोदकाम करत आहेत. नदीपत्रात हे लोक मुघलकालीन सोन्याची नाणी शोधत आहेत. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून कोणालाही एकही नाणे मिळालेले नाही.
पार्वती नदीच्या काठावर नानासाहेब मराठा ही कुरावरजवळील समाधी आहे. तेथे अशी अफवा पसरवण्यात आली होती की, या समाधीजवळून मुघलही गेले होते. या नदीत 8-10 मुघल नाणी सापडली आहेत. गावकऱ्यांनी ही अफवा खरी समजून नदीपात्रात खोदकामाला सुरुवात केली आहे.
मागील 5 दिवसांपासून गावातील शेकडो लोक या नदीपात्रात मुघलकालीन सोन्याची नाणी शोधत आहेत.