ऑनलाईन टीम / रायसेन :
देशभरात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसने आता मध्यप्रदेशातील जेलमध्ये देखील शिरकाव केला आहे. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका जेलमधील 64 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर प्रशासनाने जेलरला निलंबित केले आहे. राज्याचे जेलमंत्री नारोत्तम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
जेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गृहमंत्र्यांनी जेलरला जबाबदार ठरवले आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, जेलच्या महासंचालकांना याबाबत सूचना देण्यात आली असून जेलरला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, कोरोना झालेल्या 40 कैद्यांना विदिशा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उरलेले कैदी रायसेन जेलमध्येच आहेत.
पुढे ते म्हणाले, राज्यात अशी व्यवस्था केली जात आहे की, कोणताही अपराधी किंवा कैदी जेलमध्ये आल्यावर पहिल्यांदा त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल आणि संस्थात्मक पद्धतीने त्यांना जेलमध्ये क्वारंटाइन केले जाईल.
जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने आणि कोरोनाची टेस्ट देखील केले जात नव्हती. पोलीस अधीक्षक अमृत मीणा यांनी सांगितले की, नुकतेच उप जेलमध्ये चार नवीन कैद्यांना ठेवण्यात आले होते. ते कैदी कोरोना पॉझिटिव्ह होते. आणि त्यामुळेच अन्य 64 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.