बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. गुरुवार दि. 2 रोजी मतदानयंत्रे व इतर साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचविण्याचे काम करण्यात येणार असून, याकरिता बी. के. मॉडेल स्कूलमध्ये तयारी करण्यात आली आहे. तसेच बुधवारी पोस्टल बॅलेट देण्याचे काम करण्यात आले.
महापालिका कार्यालयात निवडणुकीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मनपाचे अधिकारी व कर्मचारी या कामात रात्रंदिवस गुंतले असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी लागणाऱया साहित्याची जमवाजमव करून बी. के. मॉडेल शाळेमध्ये मतदान केंदाप्रमाणे ठेवण्यात आले. तसेच सरकारी कर्मचारी किंवा दुसऱया ठिकाणी काम करणाऱया सरकारी कर्मचाऱयांना आणि निवडणुकीत काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली होती. सदर पोस्टल बॅलेट देण्याचे काम मनपा कार्यालयात करण्यात आले. प्रत्येक मतदार संघाप्रमाणे ही व्यवस्था करण्यात आली. यावेळी मनपाच्या अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, कौन्सिल सेपेटरी बन्सी आणि साहाय्यक कौन्सिल सेपेटरी एच. बी. पिरजादे आदींसह अधिकारी उपस्थित होते.