प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका एससी-एसटी नोकर संघटनेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड गुरुवारी करण्यात आली. अध्यक्षपदी सुरेश द्यावण्णावर, उपाध्यक्षपदी एल. एस. बच्चलपुरी यांची निवड करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध समस्या मांडून कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱयांची माहिती देण्यात आली.
बुधवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीवेळी एससी-एसटी नोकर संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कार्यकारी मंडळाची निवड करून अध्यक्ष, उपाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या प्रधान कार्यदर्शीपदी देवेंद्र कांबळे, कार्यदर्शी निर्मला हंजगी, खजिनदार गजानन कांबळे, संघटना कार्यदर्शी म्हणून संतोष कांबळे आदींची नियुक्ती करण्यात आली. तसेच पदाधिकारी म्हणून परशराम मेत्री, संजय कंग्राळकर, मिनाक्षी बळ्ळारी, सुशांत कांबळे, शिवानंद भोसले आदींची निवड करण्यात आली.