ओटवणे / प्रतिनिधी:
पुणे येथील आर्ट बिटस् फाऊंडेशनचा यावर्षीचा आर्ट बिटस् महाराष्ट्र ‘युवा कला गौरव’ पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा दशावतारातील लोकप्रिय हार्मोनियम वादक मयुर गवळी याना जाहिर झाला आहे. मयुर गवळी या युवा हार्मोनियम वादकाने आपल्या सुरेल आवाजातुन दशावतार लोककलेच्या माध्यमातून ‘भाव अंतरीचे हळवे’ हे लंगार गीत सातासमुदरापलीकडे पोहोचवीले. या कलेच्या माध्यमातून त्यांनी संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन विविध क्षेत्रातील संस्थानी त्याच्या या कलेचा गौरव केलेला आहे. मयूर गवळी यांच्या अल्पावधीतील या कलेची दखल घेऊनच त्यांची युवा कला गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच ऑनलाइन पद्धतीने हा पारितोषिक वितरण होणार असल्याचे आर्ट बिटस् फाऊंडेशनचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ यांनी सांगीतले. मयुर गवळी यांची युवा कला गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतुन अभिनंदन होत आहे.