प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्याला मान्यता देण्यात आली.
सन 2020 ते 2023 कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी राहणार आहे. उपाध्यक्षपदी रामभाऊ कुटे, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, सहचिटणीस संग्राम गोडसे या पदाधिकाऱयांसोबत रघुनाथ बांडगी, मोहन सप्रे, एस. ओ. जाधव, ईश्वर लगाडे, राजू पावले, दत्तात्रय जाधव, मनोहर बिर्जे, शीतल वेसणे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.