प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे संस्थापक, तरुण भारत वृत्तपत्राचे संस्थापक, थोर समाजसेवक कै. बाबुराव ठाकुर यांचा स्मृतिदिन टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये (डीएड) आचरण्यात आला.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या एच. पी. परुळेकर यांनी कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संस्था स्थापन करण्यामध्ये बाबुराव ठाकुर यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. तसेच त्यांनी बाबुराव ठाकुर यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी कॉलेजचे प्रा. एम. के. पाटील, प्रा. एम. बी. हुंदरे, प्रा. व्ही. पी. महाजन, सुरेश नाझरे, पालक सुभाष पाटील, कल्लाप्पा परसण्णावर आदी उपस्थित होते.