वृत्तसंस्था/ अबु धाबी
रशियाचा टेनिसपटू पाचवा मानांकित आंद्रे रूबलेव्हने शनिवारी येथे विश्व टेनिस चॅम्पियन्सशीप प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव केला.
रूबलेव्हने अंतिम सामन्यात अँडी मरेचा 6-4, 7-6 (7-2) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला तिसऱया स्थानासाठी झालेल्या सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हकडून हार पत्करावी लागली. या सामन्यात शेपोव्हॅलोव्हने नदालचा 6-7 (4-7), 6-3, 10-6 असा पराभव केला. ब्रिटनच्या अँडी मरेने या स्पर्धेत नदालला पराभूत करून अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली होती.