प्रतिनिधी/ पणजी
भारतातील गॅझेट्सच्या आघाडीच्या मल्टी-ब्रँड रिटेलर्सपैकी एक असलेल्या बेंगळुरुस्थित संगीता मोबाईल्स या कंपनीने गोव्यातही दमदार प्रवेश घेताना पहिल्याच दिवशी 5 स्टोअर्सचे उद्घाटन केले. देशभरात लाखो ग्राहकांना चांगली सेवा दिल्यानंतर, संगीता मोबाईल्स गोमंतकीय ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले असून ’वन-स्टॉप डेस्टिनेशन’ असलेल्या या आस्थापनाच्या माध्यमातून स्मार्ट गॅझेट्स खरेदीचा नवा अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना संगीता मोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद्र यांनी, गोव्याचा भाग होण्यात आम्हाला खूप आनंद मिळतो आणि सर्वोत्कृष्ट डीलसह संपूर्ण नवीन प्रकारचे स्मार्ट गॅझेट अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत, असे सांगितले.
आकर्षक ऑफर्सची खैरात
पुढे बोलताना चंद्र यांनी, संगीता स्टोअरला देशभरातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. असेच प्रेम आणि लोकप्रियता गोव्यातही मिळेल आणि त्याचा ग्राहकांना फायदा होईल, असे नमूद केले. यावेळी त्यांनी प्रारंभीच्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्सचीही घोषणा केली. त्यात इअरफोन रु. 19, पॉवर बँक रु. 99, कॅमेरा फोन रु. 999, आदींचा समावेश आहे. ’आयसिंग ऑन द केक’ या ऑफर अंतर्गत 365 दिवस सर्व स्मार्टफोन्सवरील नुकसान संरक्षण मिळेल.
स्मार्ट गॅझेट्सचे वन-स्टॉप डेस्टिनेशन
त्याशिवाय खात्रीशीर बायबॅक किंमत, चोरीपासून संरक्षण, आदी योजनांचे फायदे गोव्यातही उपलब्ध करून दिले असून संगीता स्टोअरला गोव्याचे स्मार्ट गॅझेट्सचे वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून स्थापित केले आहे, असे चंद्रा यांनी पुढे सांगितले.
भविष्यात संगीताकडून स्मार्ट गॅझेट्सवर दररोज आकर्षक ऑफर्ससह खात्रीशीर भेटवस्तू/बक्षिसे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन चंद्रा यांनी दिले.
1974 मध्ये ’संगीता’ ची स्थापना 1974 मध्ये एलपी नारायण रेड्डी आणि मित्रांनी ग्रामोफोन विकण्याचे एक दुकान स्थापन करून या आस्थापनाची सुरूवात केली होती. आज सुभाष चंद्र यांच्या गतिशील नेतृत्वाखाली संगीताने खूप मोठा पल्ला गाठला आहे. दर्जेदार उत्पादने आणि नाविन्यपूर्ण रिटेल सोल्यूशन्स प्रदान करतानाच प्रति÷sसह स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाने ’संगीता’ ला केवळ नवीन उंचीवरच नेले नाही तर मोबाइल क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ब्रँड बनवले आहे.