कोल्हापूर / प्रतिनिधी
मल्हारपेठ येथील ‘स्पार्टन बॉईज’च्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात. बुधवारी या ग्रुपच्या वतीने कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी दहा हजार शेणी दान करण्यात आल्या. शहाराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोनाबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता पंचगंगा स्मशानभुमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिणामी पंचगंगा स्मशानभुमीवर मोठा ताण पडला असून शेणीचा तुटवडा जाणवत आहे.त्यामूळे महानगरपालिका प्रशासनाने शेणी दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनस प्रतिसाद देत स्पार्टन बॉईजच्या वतीने बुधवारी 10 हजार शेणी दान करण्यात आल्या. यावेळी सरपंच सीताराम सातपुते, सदस्य सुदर्शन पाटील, माजी सदस्य संजय मोरे,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तूळसवडे,सिद्धकाला हायस्कुलचे मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील, कल्लापा काळे,परशुराम सातपुते, रूपेश पाटील, सचिन काळे, प्रकाश गुंडा पाटील, सरदार कापसे, निवृत्ती कापसे आदी उपस्थित होते.